जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात, चंद्रकांत पाटलांची टीका

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झालायपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्र्कर्णात पाटील यांच्यात वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहे अशातच आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. कालचक्र नेहमी फिरत असते. कोण कोणाला म्हसनात पाठवेल हे कळेल. जनता सगळ्यांना उत्तर देईल अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिले तर लढवणार आणि जिंकणारही असंही त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जवळजवळ ज्या कारवाया झाल्यात त्या कोर्टात सिद्ध झाल्या. परंतु कोर्टावरही त्यांचा अविश्वास आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावरील आरोप कोर्टाने नाकारले नाहीत. जे आरोपपत्र दाखल झाले त्यावर कोर्टाने सहमती दर्शवली. संजय राऊतांचे काम केवळ तपास यंत्रणावर संशय निर्माण करण्याचं आहे. जे जे अनैतिक आहे म्हणजे शरद पवारांच्या सांगण्यावरून शिवसेना-भाजपात तेढ निर्माण करण्याचं काम राऊतांचे आहे. २०१४ पासून गेल्या ८ वर्षापासून हेच सुरू आहे असा आरोप त्यांनी राऊतांवर केला.

तसेच भाजपा नेत्यांवर आरोप असतील तर न्यायालय आहे. अनिल देशमुखांबाबत जयश्री पाटील कोर्टात गेल्या. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे. राऊतांना कोर्टात जाता येत नसेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Team Global News Marathi: