मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कॉम्पुटरसह इत्तर यंत्रणा पडली बंद

 

मंत्रिडळाची महत्वपूर्ण बैठक सुरू होण्यापूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकारे मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर आता आज पुन्हा एकदा वीज पुरवठा खंडित झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी वीज पुरवठा खंडित झाल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मंत्रालयातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता.

यामुळे एकच गोंधळ उडाला होता. काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा संपर्क तुटला होता. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मंत्रालयाला लोडशेडिंगचा फटका बसला होता.

तसेच अनेक मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गूल झाली होती. एक तास वीज खंडीत झाला होता. मुंबईत मंत्रालयासमोरील अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात 17 मे रोजी संध्याकाळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. तब्बल 1 तास वीज पुरवठा बंद होता. त्याच दिवशी सकाळी सुद्धा वीज पुरवठा बंद झाला होता. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा मंत्र्यांच्या बंगल्यातील लाईट केली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या बंगल्यात वीज गेली होती.

Team Global News Marathi: