जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर अजित दादा खूश होते

 

नागपूर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले आहे. काल हिवाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जयंत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे

‘जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. काल अजित पवार खूश होते, सरकार पडल्यानंतर काल पहिल्यांदा मी एवढ अजित पवार यांनी खूश असल्याच पाहिलं आहे, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांना लगावला.

काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांची बाजू घेतली की, त्यांची ठाचली हे लक्षात आलेले नाही, असंहीआमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. ‘मी गेल्या दहा वर्षापासून जयंत पाटील यांना नडत आहे, ते माझ काहीही वाईट करु शकलेले नाहीत, असंही पडळकर म्हणाले.

Team Global News Marathi: