नगरमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या आणि जुन्या नेत्यांना डावलून जयंत पाटलांच्या नातेवाईकांना पद बहाल 

 

 

नगर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपद दिलं आहे. त्यातच आता त्यांच्या आणखी एका नातेवाईकाला मोठं पद देण्यात आलं आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत आणि वरिष्ठ नेते असून त्यांचं पक्षासाठी तसेच पक्षवाढीसाठी मोठं योगदान आहे. अशांना बाजूला ठेवत आपल्या नातेवाईकांना मोठं पद देत त्यांची पदावर वर्णी लावली आहे.

 

संपूर्ण देश आणि विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून प्रयत्न सुरू होते. यामध्ये साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत आहेत मात्र त्यांना डावलून मात्र शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या आशुतोष काळेंना हे पद देण्यात आलं आहे.

 

जयंत पाटील यांच्या दोन्ही बहिणी नगर जिल्ह्यात आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी उषा तनपुरे आणि माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पत्नी नीलिमा घुले या जयंत पाटलांच्या बहिणी आहेत. नरेंद्र घुले हे चंद्रशेखर घुले यांचे भाऊ आहेत. चंद्रशेखर यांची मुलगी चैताली या आशुतोष काळे यांच्या पत्नी आहेत. आत आय नियुक्तीमुळे स्थानिक नेते नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता यांची नाराजी राष्ट्रवादी कशी दूर करणार हे पाहावे लागणार आहे,

 

Team Global News Marathi: