जयंत पाटील यांचे निलंबन, ‘ईडी सरकार हाय हाय’ राष्ट्रवादी पक्षाचे आंदोलन

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे हिवाळी अधिवेशानापर्यंत निलंबन केल्याने नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी भवन येथे जोरदार निदर्शने केली.यावेळी “निर्ल्लज सरकारचा निषेध असो, ’50 खोके एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. अधिवेशन कालावधी कमी असल्याने आपले प्रश्न मांडण्यासाठी विरोधक आमदार प्रयत्नशील असतात. परंतु सत्ताधारी अनेक प्रश्न बाजूला सारत असल्याने विरोधक आमदार आक्रमक होताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची व महापुरुषांची बदनामी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आदि मुद्द्यांवर चर्चा होत नसल्याने तसेच दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सदनांत विधानसभा अध्यक्षांविरोधात असंसदीय शब्द वापरला.

दरम्यान सरकार पक्षाकडून अध्यक्षांबाबत आक्षेपार्य विधान केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र दुसरीकडे विरोधी पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांना उद्देशुन विधान नव्हते तर सरकारला जाब विचारण्यासाठी असे विधान केल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले जात आहे. मात्र या वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशानापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. परंतु हे विधान त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून न बोलता शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून बोलल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याची दिसून येत आहे.

Team Global News Marathi: