जयंत पाटील ‘जंत’, तर आव्हाड ‘नाग’, राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोडपले!

 

ठाणे, 12 एप्रिल : ‘करारा जवाब मिलेंगा’ असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray thane sabha 2022)  यांची तोफ ठाण्यात धडाडली. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करत शरद पवार (sharad pawar), अजित पवार (ajit pawar), सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्याचवरच जोरदार टीकाकस्त्र सोडले. जयंत पाटील यांना जंत पाटील तर आव्हाडांना थेट नागांची उपमाच देऊन राज ठाकरे जोरदार बरसले.

गुढीपाडव्याच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्री आमदारांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्याला उत्तर म्हणून आज ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी आपल्या शैलीत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

.’शरद पवार यांनाही नोटीस येणार याची चाहूल लागली होती. त्यानंतर किती नाटक केलं. एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची कारवाई झाली. मग सुप्रिया सुळे यांच्या घरी का होत नाही. शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक जास्त बोलताय, मग हे मोदींना भेटले. त्यानंतर पुन्हा मोदींना भेटले आणि मलिक मध्ये गेले. आता संजय राऊत यांच्याबद्दल पवार मोदींना भेटले. संजय राऊतांना कुठे लटकवतील ना,कळणार सुद्धा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

 

1999 साली राष्ट्रवादीचा जन्म झाला. जातीपातीचे राजकारण सुरू झाले. चुकीचा इतिहास सांगितला अशी टीका पवारांनी केली. राष्ट्रवादीने सी ग्रेड बिग्रेड संघटना काढली. त्या 1999 नंतरच कशा आल्यात. त्या पवारांनी काढल्यात. पुण्याच्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला होता. शरद पवार जेव्हा जेव्हा भाषण करता तेव्हा हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा म्हणतात. पण, हा महाराष्ट्र जर कुणाचा असेल तर तो त छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. पवार कधीच सभेत शिवरायाचं नाव घेताना दिसत नाही. शिवरायांचं नाव घेतलं तर मुस्लिम मत जातील म्हणून ते नाव घेत नाही, असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी केला.

‘काय पण घ्याल, नागाने फना काढावा ना असा, उद्या परत काही तरी बोलेले, डसतो वगैरे, ये शेपटी पकडून फेकून देतो. वस्तरा सापडला तर राजकारण सोडून देईल म्हणाले. आता तिथे वस्तारा कसा सापडणार, दाढी कुणी करतच नाही. मग वस्तारा कसा सापडणार. आव्हाडांच्या बुद्धीची कीव येते, असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी लगावला.

‘अजित पवार यांना पठ्ठा म्हणायची सवय आहे. तुमच्या माहितीसाठी मी 3 व्हिडीओ आणले आहे.  मी केव्हा काय बोललो हे मला नीट आठवतं. मी याच्याआधीही बोललो होतो. पण, त्याचे मला काही सापडले नाही. काय झालं, सकाळचा शपथविधी झाला, तो पवार साहेबांना कान काही ऐकू येत नाही. तसा त्यांना बॉम्ब फुटल्यानंतर कू असा आवाज येत होता. 28 जुलै 2018 रोजी मी बोललो होतो, असं म्हणत भोंग्याबद्दल व्हिडीओ चालून दाखवला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2018 रोजी बोललो होतो, त्यावेळीही मी औरंगाबादमध्ये भोंग्याची स्पर्धा सुरू आहे, त्यांना अजान वाचायची असेल तर वाचा, लाऊडस्पिकर कशाला पाहिजे, असा व्हिडीओच लावून दाखवला. लॉकडाऊन लागण्याआधी सुद्धा अधिवेशनामध्ये सुद्धा मशिदीमध्ये भोंगे सुद्धा बंद केले पाहिजे, असं बोलणार व्हिडीओ राज ठाकरेंनी भर सभेत वाजवून दाखवले.

वाचा राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

मशीदीवरील भोंगे काढा राज ठाकरे यांचे मुस्लिम समाजाला आवाहन

आता फक्त हनुमान चालीसा म्हटले आहे माझ्या भात्यात अनेक बाण आहेत ते काढायला लावू नका

प्रत्येकांनी आपापला धर्म घरात ठेवावा, सणांच्या दिवशी आपण समजू शकतो,

परंतु वर्षाचे ३६५ दिवस हे नाटक चालणार नाही.

एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर अजून तोडगा निघत नाहिये

जातीतून बाहेर आपण पडणार नाही तर आपण मराठी कधी होणार आणि जो मराठी होणार नाही तो हिंदू कधी होणार?

मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे कुठे गेले? – राज ठाकरे

बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचले. – राज ठाकरे

शरद पवार हे नास्तिक आहेत, ते देव धर्म मानत नाहीत – राज ठाकरे

कारण महाराजांचे नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते मिळणार नाहीत.

शरद पवार कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत.

संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना राष्ट्रवादीने जन्माला घातल्या- राज ठाकरे

संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?

पाकिस्तानी कलाकारांच्या ढुंगणावर लाथा मारणारी संघटना मनसे

सोनिया गांधी नको म्हणून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि नंतर कृषीमंत्री झाले.

मुंब्र्यातून अनेक दशतवाद्यांना अटक,राज ठाकरे यांनी वाचली नावे.

नागाने फणा काढावा असा जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा

तीन तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृह खात्याला विनंती आहे,

कुठलाही तेढ निर्माण करायचा नाही, कुठलीही दंगल घडवायची नाही.

३ मे पर्यंत मशीदीवरील सर्व भोंगे काढा, राज ठाकरे यांचा अल्टिमेटम

यातून आम्ही बाहेर पडणार नाही, राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

कानांना त्रास होत असेल तर भोंगे उतरवलेच पाहिजे,

जर भोंगे उतरले नाही तर आम्ही हनुमान चालीसा लावणारच – राज ठाकरे

हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे.

अझानची गरज काय, रस्त्यावर नमाज कशासाठी – राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले लाव रे तो व्हिडीओ

राज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री,

राज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री

दोन अडीच वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर भुजबळ यांचा पहिला शपथविधी.

भुजबळ यांच्या संस्थेत गैरव्यवहार केल्यामुळे तुरुंगात.

राष्ट्रवादी हा निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी, शरद पवार हे त्याची रशी

मनसे हा दुसर्‍या पक्षांना विझवत नेणारा पक्ष

सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे सुळे वेगळे.

राज ठाकरे यांच्याकडून जयंत पाटील यांचा जंत पाटील असा उल्लेख

अजित पवार यांच्या घरावर धाड पडल्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे संबंध सुमधुर कसे?

पवार साहेब आज संजय राऊत यांच्यावर खूश आहेत, लवकरच टांगलेले दिसतील.

पवार साहेब खुश झाले की मला भिती वाटते असे मी म्हणालो होतो

अजित पवार यांच्या घरावर धाडी पडल्या सुप्रिया सुळे यांच्या घरावर धाडी का नाही पडल्या?

राज ठाकरे यांनी घेतला विरोधकांचा समाचार

देशात समान नागरी कायदा आणा आणि देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणा, राज ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे अशी भूमिका घेणार मी पहिलाच.

कलम ३७० हटवल्यानंतर अभिनंदन करणारा मीच.

अशा नोटिशींना मी भीक नाही घालत.

शरद पवार यांना ईडीची नोटीस येणार होती, तरी त्यांनी किती नाटकं केली.

मला नोटीस आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात आलो होतो.

ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक नाही बदलली.

नरेंद्र मोदींच्या अनेक भूमिका पटल्या नव्हत्या.

काही पत्रकार झाले, काही संपादक झालेत.

अनेक पत्रकार राजकीय पक्षाशी बांधील झाले आहेत.

परंतु ही सभा मोठी स्क्रीन दाखवून जम्मूमध्ये दाखवली जात आहे.

अनेक ठिकाणी ही सभा विजेच्या कारणामुळे दाखवण्यात येत नाहिये.

अनेक पत्रकार राजकीय पक्षाला बांधील असून ते विषय भरकटवतात.

हे तारे तोडले याचे उत्तर द्यावे लागेल

गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक नेत्यांनी तारे तोडले

माझा ताफा अडवणार हे गुप्तचर खात्याला कळाले परंतु शरद पवार यांच्या घरावर कोणी हल्ला केला हे गुप्तचर खात्याला माहित नाही.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: