शरद पवारांनीच पंतप्रधानांना भेटून ‘त्या’ तिघांचा गेम केला,

 

मुंबई | एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची कारवाई झाली. मग सुप्रिया सुळे यांच्या घरी का होता. शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक जास्त बोलताय, मग हे मोदींना भेटले. त्यानंतर मलिक जेलमध्ये गेले. आता संजय राऊत यांच्याबद्दल पवार मोदींना भेटले’ असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे.

ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तसेच सुप्रिया सुळे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला तर जयंत पाटील यांचा जंत पाटील असा थेट सभेत उल्लेख केला होता तसेच आपल्याला आलेल्या ED नोटिसा वर आपले मत मांडले होते.

कोहिनूर मिलच्या व्यवहारात माझे नाव आले होते. त्या भानगडीतून मी बाहेर पडलो. नंतर ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवार यांनाही नोटीस येणार याची चाहूल लागली होती. त्यानंतर किती नाटक केलं. एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची कारवाई झाली. मग सुप्रिया सुळे यांच्या घरी का होत नाही. शरद पवार लगेच पंतप्रधान मोदींची भेट घेतात. अनिल देशमुख यांचा मार्ग मोकळा केला. नवाब मलिक जास्त बोलताय, मग हे मोदींना भेटले. त्यानंतर पुन्हा मोदींना भेटले आणि मलिक मध्ये गेले. आता संजय राऊत यांच्याबद्दल पवार मोदींना भेटले. संजय राऊतांना कुठे लटकवतील ना,कळणार सुद्धा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: