जयंत पाटील पाठोपाठ आता नवाब मलिक यांनी खासदार अमोल कोल्हे यांची केली पाठराखण

 

मुंबई | ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यावरुन टिकेचे धनी ठरलेल्या खासदार अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ सरसावली राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. खासदार अमोल कोल्हे महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करत नाहीत.राष्ट्रवादी पक्ष कधीही गांधीहत्येचं समर्थन करत नाही, असे नाही, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

२०१७ साली या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यांनी या संदर्भात खुलासाही केला आहे. त्यामुळे याविषयावर चर्चा थांबायला हवी, असंही ते म्हणाले. आम्ही नथुराम गोडसेचं समर्थन करत नाहीत, हे त्यांना यावेळी सांगितले. मात्र दुसरीकडे यांच मुद्द्यावरून राजकारण सुरु झाले आहे.

आता ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटातील खासदार अमोल कोल्हेंनी वठविलेली नथुराम गोडसेची भूमिका हा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं मत राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे.

Team Global News Marathi: