अमोल मिटकरींकडून कोल्हेंची पाठराखण, रामायणातील रावणाचं दिलं उदाहरण

 

मुंबई | ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यावरुन टिकेचे धनी ठरलेल्या खासदार अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ सरसावली राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. खासदार अमोल कोल्हे महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करत नाहीत हे आता खुद्द आमदार अमोल मिटकरी यांनी पटवून दिले आहे. यावेळी मातीकारी यांनी सामायणातील उदाहरण दिले आहे.

आयुष्यभर ‘रामभक्त’ असणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी रामायणात साकारलेल्या रावण पात्राचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते. रामभक्त असताना त्यांनी रावणाचे पात्र स्वीकारले कारण कुठल्याही कलाकाराचा धर्म हा कलाकृतीला जिवंतपणा देणारा असतो. त्यामुळेच, २०१७ मध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी साकारलेले नथुराम गोडसे यांचे पात्र ही केवळ एक कलाकृती आहे. म्हणून खासदार कोल्हे साहेब नथुराम गोडसे यांच्या विचारांचे झाले असे होत नाही

यावे स्पष्टीकरण देताना कोल्हा म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती. त्यानंतर, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना घरघरात पोहचविण्याचं कामही केलं आहे. शेवटी कलाकार म्हणून ही भूमिका पार पाडली आहे.

 

Team Global News Marathi: