संभाजीनगर | शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा आरोप खैरे यांनी कडून एकचं खळबळ उडवून दिली होती.
चंद्रकांत खैरे यांनी मीडियासी संवाद साधताना हा आरोप केला आहे. यावेळी खैरे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटप केले. त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, असा हल्लाही खैरे यांनी चढवला.
यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली. कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.