जाती-धर्माविरोधात वक्तव्य करू नका, पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांना झापलं

 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सहकाऱयांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या काही वक्तव्यांमुळे ब्राह्मण समाजात एक अस्वस्थता होती. याबाबत पक्षांतर्गत झालेल्या चर्चेत कुठल्याही जात, धर्म याविरोधात कोणीही वक्तव्य करू नये, धोरणाच्या संदर्भात बोलावे, अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत, असे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.


शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी राज्यभरातील ब्राह्मण संघटनांनासोबत आज बैठक घेऊन राष्ट्रवादीची भूमिका आणि ब्राह्मण संघटनांचे म्हणणे यावर चर्चा केली. बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील हा वर्ग शहरात येत आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत अधिक संधी हवी आहे.

तसेच आम्ही केंद्र आणि राज्याची माहिती गोळा केली होती. त्यात नोकऱयांमध्ये त्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिकच दिसली. त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचे सूत्र बसणार नाही असे मी सांगितले अशी माहिती शरद पवार यांनी दिली. ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ काढावे अशी मागणी त्यांनी केली. तो प्रश्न राज्य सरकारचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वसन त्यांना दिले, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: