करिना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार?, स्वत:च केला खुलासा

 

करिना कपूर खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. करिनाप्रमाणे तिच्या दोन्ही मुलांची देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते.करिना व सैफ अली खानने 2012 साली लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांना तैमुर अली खान व जहांगीर अली खान असे दोन मुलंही झाले. करिनाच्या दोन्ही मुलांचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.

त्यातच आता करिना तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.काही दिवसांपासून करिनाचा एक फोटो व्हायरल होत होता. त्यात करिना गरोदर असल्याचं स्पष्टपणे भासत होतं. या चर्चांना आता करिनाने पूर्णविराम दिला असून स्वत:च तिच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल खुलासा केला आहे. या खुलाशामुळे आता उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

करिनाने तिच्या अधिकृत इंन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. शांत रहा. मी प्रेग्नेंट नाही. सैफ म्हणतो त्याने लोकसंख्यावाढीत आधीच खूप योगदान दिलं आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया करिनाने दिली आहे. दरम्यान, माझं जे पोट दिसत आहे ते फक्त पास्ता आणि वाईनमुळे आहे, असंही करिना म्हणाली आहे.

Team Global News Marathi: