जरंडेश्वर कारखान्याचे संचालक भाजपच्या किरीट सोमय्यांच्या भेटीला !

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारे माजी खासदार किरीट सोमय्या सध्या चांगलेच महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. त्यातच आता जरंडेश्वर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असलेल्या गुरू कमोडिटी प्रा. लि., जरेंडेश्वर शुगर प्रा. लि.राज्य सहकारी बँकेसह इतर जिल्हा बँकांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी जरंडेश्वर कारखान्याच्या संचालकांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतली.

कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर प्रकरणी किरीट सोमय्या यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली. यावेळी जरंडेश्वरचे उपाध्यक्ष सापते, शंकरराव भोसले, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक पोपटराव जगदाळे उपस्थित होते. तसेच कारखाना सभासदांच्या मालकीचा होऊन तो तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखाना राज्य बॅंकेने जप्त करून नाममात्र किमतीला गुरू कमोडिटीला विकला असून बॅंकेने अन्यायकारक भूमिका घेतली असल्याचा आरोप डाॅ. शालिनीताई पाटील गेली १८ वर्षे केला आहे. काही दिवसापूर्वी इडीची या कारखान्याला नोटीस आलेली आहे. तेव्हा या सर्व गोष्टीस जबाबदार असणाऱ्या गुरू कमोडिटी तसेच बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संचालकांनी किरीट सोमय्याकडे केली.

Team Global News Marathi: