जर निर्दोष असतील तर कायदेशीर बाजू लढावी, आशिष शेलारांचे आवाहन

 

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी आज सकाळी ट्विट करत राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी ७२ तासांमध्ये दोन खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड दुखावले गेले असून त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा देत पोलिस अत्याचाराविरोधात लढणार असल्याचे सांगितले आहे.

रविवारी रात्री मुंब्रा येथील कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या हेतूने स्पर्श केल्याचा आरोप भाजप महिला पदाधिकाऱ्याने केला. दरम्यान, आरोपांचा आणि राजीनाम्याचा काय संबंध? असा प्रश्न करत भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावरून प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले, आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध? चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंडचे स्टेशन आले का? हे असे विचारण्यासारखे झाले. जर ते निर्दोष आहेत तर कायदेशीर बाजू लढावी. प्रत्येक निर्दोष व्यक्तीला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा असते. ते सिद्ध करता येत नसेल तेव्हा हे वेडे चाळे केले जातात. त्यामुळे या आरोपांचा आणि आमदारकीचा संबंध नाही.

सामान्य महाराष्ट्रातल्या मराठी कुटुंबाला, आरोप-प्रत्यारोप, विनयभंग, दादागिरी करू नये. दादागिरी केल्यास त्यावर कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवले. म्हणून त्यांचे स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतोय, असे वक्तव्य शेलार यांनी केले. माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलीस जबाबदार, असे तालिबानी माणसाला शोभणारे वक्तव्य जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहेत, असा आरोपही यावेळी आशिष शेलार यांनी केला.

Team Global News Marathi: