दिल्ली दरबार हॉटेलचे मालक जाफरभाई यांचे निधन
बिर्याणी आणि मोगलाई जेवणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने बिर्याणीसाठी मुंबईभर प्रसिद्ध असलेल्या दिल्ली दरबार हॉटेलचे मालक जाफर गुलाम मन्सुरी यांचे कोरोनामुळे काल निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते. मुंबईत मोगलाई पद्धार्थ मिळण्यासाठी जाफरभाई यांचे “दिल्ली दरबार” हॉटेल चांगले प्रसिद्ध होते.
कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना २ सप्टेंबर रोजी जाफरभाई यांना मुंबईतल्या ब्रीच कॅण्डी कोरोना वॉर्डात भरती करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र गुरुवारी वयोमानानुसार उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचे गुरुवारी निधन झाले.
दिल्ली दरबार हॉटेल मधील बिर्याणीला मुंबईकरांचा चांगला प्रिसाद मिळाला आणि पाहता पाहता त्यांनी अनेक ठिकाणी दिल्ली दरबारच्या फ्रॅन्चायजीखाली हॉटेल सुरु केली. अगदी भारतातील अनेक शहरांपासून ते दुबईपर्यंत दिल्ली दरबारचा व्यवसाय पसरला आहे. मोगलाई पदार्थांबरोबरच बिर्याणीसाठी दिल्ली दराबर ओळखले जाते.