त्या पार्टीत आदित्य ठाकरे होते उपस्थित, या अभिनेत्रीने केला खुलासा
सिनेअभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरणी विरोधी पक्षाने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठकरे यांचे नाव सदर प्रकरनात गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता अभिनेत्री नुपूर मेहता यांनी खुलासा केला आहे. दिशा सालीयनने आयोजित केलेल्या एका पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते.
आघाडी सरकारमधील एका युवा मंत्र्याचा सुशांत सिंह प्रकरणात समावेश असल्याचे म्हणत विरोधी पक्ष भाजपने टीका केली आहे. अशातच नुपूर मेहताने केलेल्या खुलास्यामुळे नवीन वादंग पेटण्याची चिन्हे आहे . दिशा सालियान ही सुशांतची मँनेजर होती. तिचे सुशांतच्या घटनेआधी निधन झाले होते.
दिल्ली दरबार हॉटेलचे मालक जाफरभाई यांचे निधन
त्या घटनेवरही नेहमीच शंका घेतली जाते आणि नंतर या घटनेला सुशांतसिंग प्रकरणाशीही काही लोक जोडून बघतात.त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.