चिक्की घोटाळा  | धनंजय मुंडे यांनी लगावला पंकजा मुंडेंना टोला 

 

 

बीड |  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा वर आले आहे. याच मुद्द्यावरून कोर्टाने आघाडी सरकारला झापले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘माझी मागणी उच्च न्यायालयाने लक्षात घेतली आहे. पूर्वीपासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा’ अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला गेला आहे.

 

पंकजा मुंडे यांच्या मंत्री पदाच्या कालावधीतील चर्चेत असणाऱ्या चिक्की घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा वर आले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. याप्रकरणात अद्याप खासगी पुरवठादारांवर गुन्हा दाखल का केला नाही? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला गेला आहे.

 

याप्रकरणावरून धनंजय मुंडे म्हणाले की, ‘माझी मागणी न्यायालयाने लक्षात घेतली आहे. आधीपासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात देखील गेले होते. त्यामुळे आता सर्व बाबी कोर्टाच्या हळूहळू लक्षात येत आहे’ असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

 

तसेच, चिक्की घोटाळा निघाल्यापासून माझी वारंवार मागणी आहे की, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे आणि आज नाही दोन वर्षापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ACB कडे अर्ज केला आहे. सर्व विषय न्यायालयात आहे. म्हणून माननीय न्यायालय काय निर्णय घेईल ते पाहू’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: