जमत नसेल तर राजीनामा द्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले

 

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेने अद्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहे. आज त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. तुम्हाला काम करायचे नसेल तर पदावरुन दूर व्हा, असे सांगत चालते व्हा, असा इशाराच ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची बैठक झाली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर पदावरुन दूर व्हा, असे ते म्हणाले. या पूर्वी सुद्धा झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी प्रत्येक सेलला कामाचा आढावा तसेच येणाऱ्या एका वर्षात करण्यात येणाऱ्या कामाच्या माहितीची यादी देण्याचे आदेश दिले होते.

जे पदाधिकारी विभाग पातळीवर योग्य पद्धतीने काम करत नाहीत, त्यांची यादी बनवण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी विभाग प्रमुखांना दिले आहे. त्याचवेळी गट अध्यक्षांच्या नेमणुकी न झाल्यामुळे राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांपर्यंत जाऊन त्यांची काम करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी या बैठकीत दिल्या. दरम्यान राज ठाकरे पुन्हा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्यभरात दौरे सुरु करणार असल्याची माहिती आहे.

Team Global News Marathi: