जळगावात चिट्टी लिहून एसटी कर्मचाऱ्याची रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या

 

जळगाव | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या काही महिन्यापासून एट्सती कर्मचारी आंदोलन करत असून या आंदोलनाला अद्याप यश मिळलेले नाहीये अशातच राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी त्यांच्यातील संघर्ष अधिक वाढताना दिसून येत असून आजवर या संपामुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

अशातच आता जळगाव येथील यावलमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेले यावल डेपोतील ४८ वर्षीय चालकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून शिवाजीनगर परिसरातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

शिवाजी पंडीत पाटील असं आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव असून ते बारीपाडा येथे रहायला होते. माझी मन:स्थिती खराब झाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यांनी मृत्यपुर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यांना मार्च अखेरपर्यंत कामावर रुजू होण्याचे अल्टीमेटम दिला होता. त्यानुसार तणावातून शिवाजी पाटील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप एसटी कर्मचार्‍यांनी करत सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला आहे.

 

Team Global News Marathi: