जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण, तर महाजनांच्या उपस्थितीत खडसेंचा फोटो उतरवला

 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी सहकार पॅनलने एकनाथ खडसेंच्या गटाचा पराभव केला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांनी पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आमदार मंगेश चव्हाण हे दूध संघाचे अध्यक्ष झाले आहेत.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी सहकार पॅनलने 16-4 असा विजय मिळवला होता. एकनाथ खडसेंच्या गटाला केवळ चार जागांवरच समाधान मानावं लागलं होते. त्यानंतर अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर आज भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानं सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

आमदार मंगेश चव्हाण हे एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. जळगाव जिल्हा दूध संघावर तब्बल सात वर्षे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने एकत्र येत एकनाथ खडसेंचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळं त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

भाजप आमदार मंगेश चव्हाण दूध संघाच्या अध्यक्षपदी विराजमान होताच जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे यांचा फोटो काढण्यात आला आहे. त्यामुळं तब्बल सात वर्षापासून एकनाथ खडसे यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा दूध संघावर आता भाजप-शिंदे गटाची सत्ता आली आहे.

यावेळी पुन्हा एका महाजन यांनी खड्सना डिवचलं आहे जिवंतपणी कसं काय कोणी कोणाचा फोटो लावू शकतो. प्रोटोकॉलनुसार महापुरुषांचे फोटो, मुख्यमंत्र्यांचा फोटो आपण या ठिकाणी लावू शकतो. मात्र एकनाथ खडसे यांचा फोटो या ठिकाणी कसा काय? असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला

Team Global News Marathi: