भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा युवासेनेचा प्रयत्न, उडाला एकचं गोंधळ

नाशिक : आमदार नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन युवासेना सचिव वरून सरदेसाई तसेच शिवसेना पक्षावर अनेक गंभीर आणि बिनबुडाचे आरोप लावले होते. या आरोपांना वरुण सरदेसाई यांनी सुद्धा रोखठोक पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले होते. आता आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना अधिक आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

याच प्रकरणावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली होती. या घोषणेमुळे आजूबाजूच्या परिसरातील वातावरण अधिक गरम झाले होते.

या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. मात्र, आगामी काळात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता राणे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

Team Global News Marathi: