जळगाव जिल्हा बँकेत मोठी राजकीय घडामोड, जळगाव महानगर पालिकेतील २७ नगरसेवक सेनेत करणार प्रवेश ?

जळगाव : जळगावात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले असताना भाजपाचे ५७ पैकी २७ नगरसेवक सहलीला गेले आहे. अशी माहिती भाजपाच्या काही खात्रीदायक सूत्रांनी दिलेली आहे.

काही दिवसांपूर्वी बंडखोरी रोखण्यासाठी भाजपाने व्हीप जारी केला होता. मात्र त्यापूर्वीच हे नगरसेवक सहलीला गेल्यामुळे भाजपाची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. दरम्यान, महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला आहे. तसंच महापौरपदासाठी भाजपने जयश्री महाजन यांचं नावही निश्चित केले आहे.

जळगाव महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहूमत आहे. त्यात महापौर आणि उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चांगलीच रस्सीखेच निर्माण झाली होती. रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन महापौरपदाबाबत भाजपाच्या नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच भाजपाचे नगरसेवक सहलीवर रवाना झाल्यामुळे महापालिकेत भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवारी दुपारी २ वाजेपासून भाजपाचे २७ नगरसेवक नॉट रिचेबल होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाऊसवर एकत्र जमल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या ठिकाणाहूनच सेनेची सर्व सूत्रं हलली असल्याचंही सांगण्यात येत आहे. तसंच सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचीही चर्चा आहे.

Team Global News Marathi: