ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी रिंगणात

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्रित लढवण्याचे ठरवले आहे. या निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून १५ जागांसाठी महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे रविवारी जाहीर केली. शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ही नावे जाहीर केली आहे.

मार्च महिन्यात होणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे अशी घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. तसेच याला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला होता. येणाऱ्या ३० मार्चला मतदान आणि ३१ ला मतमोजणी पार पडणार आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून पंडीत पाटील (भिवंडी), सुधीर पाटील (कल्याण) , सुभाष पवार (मुरबाड), मधुकर पाटील (पालघर), प्रकाश वरकुटे (शहापूर), सुनील पाटील (विक्रमगड), किरण सावंत (वाडा) , लाडक्या खरपडे (तलासरी), काँग्रेस (हौसिंग मजुर संस्था), हणमंत जगदाळे (पतसंस्था), निलेश सांबरे (ओबीसी) , अनिल शिंदे (अनुसूचित जाती जमाती), विशाखा खताळ (व्हीजेएनटी), प्राजक्ता पानसरे आणि शोभा म्हात्रे (महिला प्रतिनिधी दोन जागा) यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: