जळगाव बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाजन, खडसे आणि पाटील एकत्र

 

जळगाव | जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर जळगावात सर्वपक्षीय नेत्यांची ३० ऑगस्ट रोजी दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीला माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, आमदार गिरीश महाजन आणि जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्याबाबत होणाऱ्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होणार आहे. मात्र या बैठकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसह गुलाबराव पाटील, तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचीही उपस्थिती या बैठकीला असणार आहे.

तर दुसरीकडे जिल्हा बँकेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र लढण्यावर एकमत झाले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत पुढाकार घेतला आहे. मात्र, भाजपच्या भूमिकेबाबत साशंकता आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे आश्वासन दिले होते. पण ऐन वेळी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. याचीच भीती आताही आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Global News Marathi: