मोठी बातमी | नारायण राणे आज पोलीस स्थानकाला भेट न देता थेट दिल्लीला होणार रवाना

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचयसंदर्भात वादग्रस्त विधान करून आपल्या अडचणी वाढूं घेतल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राणेंना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर महाड कोर्टाकडून राणेंना जामीन मंजूर झाला होता. राणेंना ३० ऑगस्ट रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात हजेरी लावणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व मंत्र्यांना दिल्लीत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राणे आज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, राणेंच्या हजेरीची शक्यता असल्यामुळे अलिबागमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राणेंना कोर्टाने महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे. त्याचसोबत यापुढे अशी आक्षेपार्ह विधानं होणार नाहीत याची काळजी घेण्याच्याही सूचना राणेंना देण्यात आल्या आहेत. यावर राणेंकडूनही कोर्टासमोर अशी विधानं यापुढे केली जाणार नाहीत अशी ग्वाही देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: