जैन डायरीतील भाजप नेत्यांची नावे जाहीर करा, संजय राऊत यांचे मोठे विधान

 

मुंबई | शिवसेना नेते आणि स्थानी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये आढळलेल्या मातोश्री या नावावरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहत असलेल्या कला नगर येथील मातोश्री असल्याचा उल्लेख करत जहरी टीका केली होती आता या टिकले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रतिउत्तर देत थेट जैन डायरीचा उल्लेख करत विरोधकांची झोप उडवली आहे.

काही वर्षांपूर्वी जैन डायरी तसेच बिर्ला डायरी उघड झाली होती. या डायरींमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांची नावे होती. ही नावे जाहीर करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदीवरून केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करीत असल्याचा संदर्भ देऊन खासदार राऊत म्हणाले, जाधव यांची डायरी जर विश्वासार्ह असेल तर यापूर्वी आलेल्या जैन डायरी व बिर्ला डायरी सुद्धा विश्वासार्ह मानून त्यात नमूद असलेल्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, जैन डायरीच्या वेळी भाजपच्या नेत्यांची नावे उघड झाल्याबरोबर डायरीतील नोंदी विश्वासार्ह नसल्याचे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन केले होते. एका डायरीला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय, ही दुटप्पी भूमिका मान्य नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाहून घेण्याची भाषा करतात. ही पाहून घेण्याची धमकी त्यांनी आम्हाला देऊ नये. ते खोटे पुरावे सादर करून खोट्या केस तयार करीत असल्याचेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: