१७ कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेलमध्ये जाणार, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

 

बीड | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी शविसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते तसेच विविध मुद्द्यावरून या तिन्ही पक्षातील नेत्यांमद्ये मत-मतांतर असल्याचे चित्र सुद्धा दिसून आले होते अशातच आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैयांनीही ‘शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका आघाडीचा धर्म पाळा असे बजावून सांगितले होते.

पुढे बोलताना खैरे यांनी टक्केवारी घेणं आणि १७ कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेल मध्ये जाणार आहे’ असा इशाराच त्यांनी दिला आहे. बीडमध्ये आयोजित शिवसेना प्रवेशाच्या जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवरच जोरदार हल्लाबोल केला. याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

तसेच महाविकास आघाडीत आम्ही देखील आहोत, त्यामुळे कुठलाही शिवसैनिकावरील अन्याय सहन केला जाणार नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी बजावून सांगितलं. ‘मी आघाडीच्या नेत्यांना ही सांगू इच्छितो आपण आघाडी मध्ये आहोत, आपलामध्ये मतभेद करायचे नाहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही आपण सगळे एक आहोत आपण एका कुटुंबातील आहोत उद्धवजी आपले प्रमुख आहेत अजितदादा प्रमुख आहेत. नेहमी गुंगीत असणारे त्यांनी समजुन घ्यावं’ असं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वरती विकास तर सोडले कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत लक्षवेधी मांडणारे स्वतः कायदा किती पाळतात, ते आम्हाला माहीत आहेत’ अशी टीकाही खैरेंनी केली

Team Global News Marathi: