जॅकीचा साधेपणा | निधनाची बातमी कळताच गाठलं काम करणाऱ्या कामगारच घर

 

मुंबई | अभिनेते जॅकी श्रॉफ याचा साधेपणा अनेकदा समोर आला आहे तसेच त्यांनी कायमच प्रेक्षकांपुढे अभिनेत्यासोबतच मोठ्या मनाचा माणूसही सादर केला. त्यांनी हा माणूस सादर केला नाही, तर नकळत त्यांच्या कृतींतून तो सातत्यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत गेला. आता पुन्हा एकदा जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे.

मावळच्या चांदखेड इशं त्यांचं एक फार्महाऊस आहे. तिथे काम करणाऱ्या एका सागर दिलीप गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी श्रॉफ यांच्या कानावर आली. त्यांनी लगेचच चांदखेड रोखानं प्रवास केला आणि या कामगाराच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं, त्यांना आधार दिला.

गाडकवाड, या कामगाच्या घरी जात त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधला आणि हा या कुटुंबाला मिळालेला सर्वात मोठा दिलासा ठरला. मात्र यावेळी जमिनीवर बसून सागरच्या परिवाराशी संवाद साधतानाचा फोटो वायरल झाला आहे एकीकडे कलाकार हा पैशाने श्रीमंत असतो पण मानाने सुद्धा श्रीमंत असल्याचे सुद्धा उदाहरण जॅकीच्या वागण्यातून दिसून आले आहे. सागरच्या कुटुंबातील सानथोरांच्या शेजारी बसून जॅकीने त्यांना आधार दिला. गेलेल्या माणसाची सल त्यांना भरून काढता आली नाही, पण त्यांच्या येण्यानं या कुटुंबाचा कोलमडलेला डोलारा सावरण्यास नक्कीच मदत झाली असणार यात हरकत नाही.

Team Global News Marathi: