“ते २५ वर्षे शिवसेनेतच होते”,संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात शविसेना आक्रमक झाली असून आय युवासेनेने राणे यांच्या जुहूच्या बंगल्याखाली आंदोलन सुरु केले होते. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या प्रतिमेला जोडो मारले, शाईफेक केली. इतकंच नाही तर नाशिक आणि ठाण्यात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर दगडफेक केली. त्यातच आता राणे यांच्या विधानावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

संजय राऊत यांनी ‘इंडिया टुडेशी’ संवाद साधताना त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. ‘भाजपचे केंद्रीय मंत्री महात्मा नारायण राणे म्हणताहेत की, मुख्यमंत्र्यांना थप्पड मारा; हे कसलं उत्तेजन तुम्ही देत आहात? ही कसली चिथावणी तुम्ही देत आहात? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची तुम्ही चिथावणी देत आहात. आपण केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही घटनेनुसार शपथ घेतलेली आहे. कायदा सुव्यवस्थेला मदत करणं हे मंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे.पण तुम्ही महाराष्ट्रात येता आणि जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली २४ तास फक्त शिवसेनेला शिव्या देत आहात, त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे’, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

नारायण राणे भाजपमध्ये जाण्याआधी शिवसेनेत होते. त्यावरून देखील संजय राऊतांनी त्यांना सुनावलं आहे. ”नारायण राणे यांचा इतिहास मग तो राजकीय असो वा इतरही. ते २५ वर्षे शिवसेनेतच होते. त्यामुळे ज्या धमक्या दिल्या जात आहेत, ही शाळा शिवसेनेचीच आहे. तुम्ही बाहेर पडलात म्हणून शाळा बंद होत नाही’. ‘बाटगे आणि उपरे यांना जवळ घेऊन भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने हे राजकारण सुरू केलं आहे, हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

Team Global News Marathi: