Big Breaking : रत्नागिरी पोलिसांकडून अटक, नाशिक पोलीस कोर्टात नेणार

संगमेश्वर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य अखेर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भोवले आहे. राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (ratnagiri police arrested narayan rane, will produce in court)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणेंच्या घरी पोहोचले. राजशिष्टाचाराचे सर्व उपचार पाळल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटक केली. राणेंना रत्नागिरी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर कागदपत्रांचं सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे.

कोर्टात आज की उद्या?

राणेंना नाशिक पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्यांना नाशिकच्या किंवा रत्नागिरीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. मात्र, राणेंना आज कोर्टात हजर करणार की उद्या याबाबतची माहिती मिळू शकली नाही. राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना आजच नाशिक कोर्टात उपस्थित केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंद खोलीत फक्त पोलीस आणि राणे

राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस राणेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी राणेंना काही कागदपत्रं देण्यात आली. यावेळी पोलीस आणि राणेच फक्त खोलीत होते. भाजपच्या सर्व नेत्यांना आणि राणेंच्या सुरक्षा रक्षकांना खोलीबाहेर ठेवण्यात आलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळते. (ratnagiri police arrested narayan rane, will produce in court)

ग्लोबल न्युज नेटवर्क: