लोकांना छळायचं अन् आंदोलनं झालं की मजा बघायची; केशव उपाध्ये यांची काँग्रेसला टोला !

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाने २ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून पळ काढल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी ट्विट करून केली होती. त्यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सावंत यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडे पडले. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरुन काल हायकोर्टानं थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला अजून जाग आलेली नाही, असं प्रत्युत्तर केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.

 

या संदर्भात उपाध्ये ट्विट करून म्हणतात की, धन्यवाद. तुम्ही ट्वीट केल्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडे पडले. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून काल हायकोर्टाने थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही.

तसेच आणखी एक ट्विट करून ते म्हणतात की, लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलन झाले की मजा बघायची असा उरफाटा कारभार आहे. आंदोलन तर होईलच. सामान्य मुंबईकरांच्यासाठी. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवतापण सामान्य मुंबईकराच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याच्या ऐवजी कुचेष्टा करता हेही जनता पहाते आहे असे ट्विट केले आहे.

Team Global News Marathi: