कोणी पत्र दिले म्हणून राजीनामा हे योग्य नाही!

परमवीर सिंग यांनी जे पत्र दिले आहे. त्या पत्राला कोणताही आधार नाही. त्यांनी दबावाखाली हे पत्र दिले असून कोणी पत्रं दिलं म्हणून लगेच राजीनामा घेणं हे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मांडली.

बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत परमवीर सिंह यांनी दिलेल्या पत्राविषयीची काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. एक पत्र येतं आणि लगेच मंत्र्यांची चौकशी असं कसं होऊ शकतं. अशी मग अनेक पत्रे येतील, असे सांगतानाच भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात आहे.

सत्ता नसल्याने ते अस्वस्थ आहेत. ही जी गोष्ट घडली ती त्यांना संधी वाटते म्हणून ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करीत आहेत, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: