कोणी पक्ष सोडून गेल्याने पक्षाला काही फरक पडत नाही – गिरीश महाजन

कोणी पक्ष सोडून गेल्याने पक्षाला काही फरक पडत नाही – गिरीश महाजन

भाजपचे माजी जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपा पक्ष श्रेष्ठीवर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. खडसे यांच्या जाण्याने भाजपाला जोरदार फटका बसला आहे अशी चर्चा होताना दिसून येत होती. यावर आता गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे.

आतापर्यंत भारतीय जनता पक्षात अनेकजण आले आणि गेले. आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असे होत नाही असा टोला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी सायंकाळी बळीराम पेठेतील वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत असताना खडसे यांच्या पक्षांतरावर सूचक वक्तव्य केले होते.

आनंद वार्ता: येत्या डिसेंबर-जानेवारीत येऊ शकते कोरोनाची लस, आदर पुनावाला यांची माहिती

पुढे बोलताना महाजन म्हणालेत की, आजही भाजपाच्या ताब्यात ८० टक्के महानगरपालिका आहेत. त्यामुळे कोणी मागणी केली तर त्या महापालिका सरकार बर्खास्त करणार आहे का? अवास्तव मागणी करून प्रसिद्धी मिळवणं हेच सध्या काम दिसत आहे. याविषयी चर्चा करणंही योग्य वाटत नाही. तुम्ही पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी कारभार सुरू झाला असे होतं नाही. भाजपा हा मोठा पक्ष असून आजवर भाजपातून अनेक जण गेले आणि आले. त्यामुळे पक्षाला कोणताही फरक पडला नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: