हिंदुत्वादाच्या मुद्द्यावरून मनसेने लिहिले मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र अन लगावला टोला

 

मुंबई | मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आणि त्यांच्या व्यथा मांडत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या दोन पाणी पत्राच्या प्रति आपल्या ट्विटर अकाऊंट वरून शेअर केल्या आहेत.

संदीप देशपांडे यांनी पत्रात म्हटलं आहे की, प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करत माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलीच शिवाय त्याला साजेस पक्षचिन्हही निर्माण केलं. ते म्हणजे ‘धनुष्यबाण’.. महाभारत ते रामायण काळापासून धनुष्यबाण हा हिंदु धर्मातलं महत्वाचं प्रतिक आहे.

परंतु आपला पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ताभोगात मग्न असल्यापासून हिंदुत्वाचा विसर पडलाय हे आम्हाला मान्यच आहे. परंतु आत्ता आपल्याला धनुष्यबाणाचाही विसर पडलेला दिसतोय हे पाहून वेदना होतात. कारण दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात चालत असेलेलं धनुर्विद्या प्रशिक्षण अनेक वर्षापासून बंद आहे.

प्रशिक्षण सुरू असताना चुकीने एक बाण तत्कालीन महापौर निवास परिसरात जाऊन पडला. यात कुणालाही इजा झाली नाही. परंतु तरीही आपण हे धनुर्विद्या प्रशिक्षण बंद करण्याचा आदेश कम ‘फतवा’च काढल्याच समजतंय. शिवसेनेचं काय दुर्भाग्य व विरोधाभास म्हणावा, ज्या चिन्हावर आपण निवडून येता त्याच चिन्हामागचा असलेला विचारच आपल्याला संपवावा वाटतोय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

 

Team Global News Marathi: