लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का ? निलेश राणे यांचा अजित पवारांना टोला

लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का ? निलेश राणे यांचा अजित पवारांना टोला

ग्लोबल न्यूज: पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडी सरकारने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या भाजपच्या पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्यात पुणे मतदार संघात तब्बल २० वर्ष सत्ता असलेल्या भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी त्यांनी भाजपाचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला होता. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

“वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” असं म्हणत भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांवर निशाणा साधला.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: