हैदराबाद महापालिकेत भाजपच्या जगात घसघशीत वाढ आता मुंबई मनपात काय होणार ?

हैदराबाद महापालिकेत भाजपच्या जगात घसघशीत वाढ आता मुंबई मनपात काय होणार ?

हैदराबाद महानगर पालिकेत भाजपाने ४ वरून थेट ४८ जागांवर मजल मारली आहे. त्यामुळे हैदराबाद महानगर पालिकेच्या सत्तेत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.


तसेच निवडणुकीची देशपातळीवर चर्चा झाली होती. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून देशातील अनेक बड्या नेत्यांनी हैदराबादच्या प्रचारात हजेरी लावली होती.

भाजपच्या या विजयामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा सुरू झाली आहे. भाजप हैदराबादची रणनीती मुंबईत चालणार का?, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. मागील निवडणुकीत TRS ने तब्बल ९९ जागा जिंकल्या होत्या.

यावेळी त्यांच्या जागांमध्ये ४४ जागांची घट होऊन ५५ जागांवर समाधान मानावे लागले. या सर्व जागा भाजपकडं गेल्याचे दिसत आहे. आता अशीच जादू भाजपा मुंबईत सुद्धा दाखवणार का? अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: