धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा यांचा वाद मिटला का?

धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा यांचा वाद मिटला का?

करुणा शर्मा भरधाव वेगात मोटारीत बसून मार्गस्थ झाल्या.

शर्मा यांनी जेलमध्ये १६ दिवस आणि १५ कोठडीत घालवले आहेत

धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक अण्णा कराड यांना पाहिले जाते

बीड : करुणा शर्मा यांना आज अखेर १६ दिवसांनी जामीन मिळाला आहे. शर्मा यांनी जेलमध्ये १६ दिवस आणि १५ रात्री कोठडीत घालवले आहेत. दरम्यान, मंगळवारी त्यांना जामीन मिळाल्यानंतर बीडच्या जिल्हा कारागृहातून करुणा शर्मा अगदी हसत बाहेर पडल्या. यावेळी माध्यमांनी घेरलं असता “नो कमेंट” म्हणत त्यांनी काढता पाय घेतला. तेवढ्यात वाल्मिक अण्णा कराड यांचं “विषय संपला आता चला” असं वाक्य सर्वांच्या कानावर पडलं. याच वाक्यानंतर करुणा शर्मा भरधाव वेगात मोटारीत बसून मार्गस्थ झाल्या. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक अण्णा कराड यांना पाहिले जाते. त्यांनी केलेल्या वक्तव्याची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शर्मा या जेलमधून बाहेर आल्यावर गाडीत बसून कुठे गेल्या हे मात्र अद्याप कळू शकले नाही. शर्मा या वाल्मिक कराड यांच्या सोबत गेल्याने धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वाद इथेच संपला? अशी चर्चा जिल्हाभरात सुरु आहे.

 

अगोदरच बाहेर उभा होती कराड यांची गाडी

दरम्यान, करुणा शर्मा याना जामीन मंजूर झाल्यावर त्या जेलच्या बाहेर येणार असल्याने सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि काही राजकीय पक्षाचे नेते देखील अगोदरच त्या ठिकाणी उभा होते. ज्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड देखील शर्मा या बाहेर येण्याअगोदरच उभा होते. दरम्यान, करुणा शर्मा यांना ज्या गाडीत घेऊन जायचे होते ती गाडी देखील अगोदरच त्या ठिकाणी उभा होती. करुणा शर्मा जेलमधून बाहेर आल्या आणि त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आणि त्या ठिकाणी उभा असलेल्या कराड यांनी लगेच त्यांना कुठल्या गाडीत बसायचे आहे हे हातवारे करून दाखवलं आणि लगेच शर्मा देखील त्या गाडीत जाऊन बसल्या.

अटक होण्याच्या अगोदर काय म्हणाल्या होत्या करुणा शर्मा?

करुणा शर्मा यांनी परळीत येण्याआधी सोशल मिडियावरती एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी परळी येथे येऊन एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होते. दरम्यान, त्यानी येत्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना साथ देणार असल्याचंही म्हटलं होत. मात्र, करुणा शर्मा या बीड जिल्ह्यात आल्यावर त्यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला होता. त्याचबरोबर त्याना १६ दिवस जेलमध्ये देखील राहावं लागल होत. त्या बाहेर आल्यावर धनंजय मुंडे यांना पुन्हा आव्हान देतील असं वाटलं होत. मात्र, त्या बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना नो कॉमेंट म्हणून थेट गाडीत जाऊन बसल्या. त्यामुळे, येत्या काळात धनंजय मुंडे विरुद्धचा त्यांचा संघर्ष वाढतो की क्षमतो हे पाहणे महत्वाचे आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: