कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणात ‘रयत’ने घेतलेली भूमिका महत्त्वाची

 

सातारा | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगावर एक मोठे संकट आले आहे. अशा कालखंडात रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गेली दोन वर्ष ऑनलाइन पद्धतीने अध्यापना सुरु ठेवले आहे. तसेच संस्थेतील सर्व अधिकारी आणि शिक्षकांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात ऑनलाइन विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. ही गोष्ट रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षाच्या लौकिकाला साजेशी अशा प्रकारचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले आहे ऑनलाईन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून म्हणून बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील हे होते.रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापनाच्या बाबतीत केलेल्या कार्याचे कौतुक करून ते पुढे म्हणाले – कोविड 19 सारख्या विषाणूमुळे जगामध्ये सर्वच क्षेत्रात एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

कोरोना संसर्गाच्या कठीण कालखंडात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाइल यासारखी साधनांची कमतरता असताना सुद्धा रोझ सारखा प्रकल्प राबवून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श संस्थेने निर्माण केला आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेने दररोज अडीच लाख विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. आज संस्थेमध्ये शिक्षण घेणार्‍या एकूण विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण ऑनलाइनच्या माध्यमातून आपण पोहोचू शकलो ही समाधानाची बाब आहे असे उदगार पवार यांनी यावेळी काढले होते.

Team Global News Marathi: