मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लावण्याची भाषा वापरणे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी राणेंना अटक केली आहे. पण काल अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राणेंचा विषय आता जास्त ताणू नये, असा विचार मांडला आहे. याबद्दल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहे.
नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील आदी नेते उपस्थितीत आहे. या बैठकीत नारायण राणे यांना रात्री जामीन मिळावा, आता हे प्रकरण आणखी वाढू, असा सूर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी लगावला आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेला मुख्यमंत्री प्रतिसाद देतील. वादावर पडदा पडेल, अशी चिन्ह आहे. राणे यांना जामीन मिळाला असला तरी प्रकृतीच्या कारणामुळे राणे पुढचा दौरा करणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप ही बैठक सुरू आहे, त्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल. मात्र राणे यांनी सूचक ट्विट करून पुन्हा एकदा सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे,