आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर

नवी दिल्ली | इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. अहमदाबाद व लखनौ या फ्रँचायझीच्या समावेशामुळे खेळाडूंचे लिलाव होत आहे. त्यामुळे ८ फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यात केवळ ४ खेळाडूंनाच कायम राखता येणार आहे. त्यामुळे फ्रँचायझींची डोकेदुखी वाढली आहे.

फ्रँचायझींना १ ते ३० नोव्हेंबर हा कालावधी दिला गेला होता आणि आज त्याची अखेरची तारीख आहे. अनेक फ्रँचायझींनी कोणाला कायम राखायचे याचा निर्णय घेतला आहे, तर काही फ्रँचायझी अजूनही संभ्रमात आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुनील नरीन, आंद्रे रसेल व ग्लेन मॅक्सवेल आदी खेळाडूंना फ्रँचायझींनी कायम राखले आहे.

बीसीसीआयनं प्रत्येकी फ्रँचायझीला ९० कोटींची पर्स दिली आहे आणि त्यातच त्यांना संघबांधणी करायची आहे. बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट दिला आहे. ही रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली जाईल. समजा एखाद्या फ्रँचायझीनं चार खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या पर्समधून ४२, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी वजा केले जातील. अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा होतील.

ही आहेत खेळाडूंची नावे

चेन्नई सुपर किंग्स – रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली
कोलकाता नाइट रायडर्स – सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर
सनरायझर्स हैदराबाद – केन विलियम्सन
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अॅनरीच नॉर्ट्झे
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन

Team Global News Marathi: