संभाजीराजेंना चर्चेसाठी निमंत्रण, वर्षा बंगल्यावर ११ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

 

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरू खासदार छत्रपती संभाजीराजे २६ फेब्रुवारीपासून आंदोलनाला बसले असून या आंदोलनाला अनेक राकीय पक्षांनी भेट दिली असून आपला पाठिंबा दर्शवला आहे तसेच मागील तीन दिव्सनपासून आंदोलनाला बसलेल्या खासदार संभाजीराजेंनी तब्येत बिघडत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अशातच आता सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

तसेच मराठा समाजाच्या हक्कासाठी हे आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही. महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.

खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे. त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी ६ मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले. याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलंय, असं ते म्हणाले.

Team Global News Marathi: