राज्यपालांचं शिवरायांबद्दल वक्तव्य, शरद पवारांचा जाहीर सभेतला ‘तो’ जुना व्हिडिओ वायरल

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात.त्यातच आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच याच विधावरून त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेतील तो जुना व्हिडिओ वायरल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी राज्यपालांना खरे गुरू कोण, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. व्हायरल व्हिडिओत काय म्हटलं आहे शरद पवारांनी शरद पवार यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, जे लोक सांगतात रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते. ते खोटं आहे.

 

शिवाजी महाराजांचे खरे गुरू जिजाऊ माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर रामदास नव्हते. शरद पवार यांचा हा व्हिडिओ एका जाहीर कार्यक्रमातला आहे.

पुढे व्हिडिओत ते म्हणतात की, ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी ही कमाल केली. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं. काय म्हणाले राज्यपाल ‘आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते.

Team Global News Marathi: