संजय राऊत यांच्या विरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा – उच्च न्यायालय

 

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्याची सहायता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका 36 वर्षीय महिलेने संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार केली होती. आपल्या पतीच्या वतीने काही गुंड आपल्यावर सतत नजर ठेवून असतात व आपला मानसिक छळ करतात, अशी तक्रार महिलेने केली. या तक्रारीनुसार चौकशी करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत.

मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या या महिलेने फेब्रुवारीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत व तिच्या पतीच्या वतीने काही गुंड तिच्यावर सतत नजर ठेवून आहेत व मानसिक छळ करत आहेत, असं याचिकेत म्हटलं आहे. याचिका दाखल केल्यावर तिला अदखलपात्र गुन्ह्यासाठी अटक झाली.

तसेच पीएच.डी.ची डिग्री बनावट असल्याचा पोलिसांचा दावा आहे, असं याचिकाकर्तीच्या वकील आभा सिंग यांनी सांगितलं. याचिकाकर्ती गेले १२ दिवस कारागृहात आहे. तिने याचिका दाखल केल्यावर पोलीस तिच्यामागे लागले, असं सिंग म्हणाल्या. याचिकाकर्तीच्या तक्रारीत पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे आणि योग्य ती पावले उचलावीत. तसेच 24 जूनपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना दिलेत.

Team Global News Marathi: