मीरा-भाईंदरमध्ये बसणार भाजपाला मोठा धक्का, तब्बल ४० नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत ?

 

मीरा भाईंदर | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षातील अनेक आजी-माजी आमदार तसेचच नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्टी देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. आता त्या पाठोपाठ मीरा-भाईंदर महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना तब्बल ४० नाराज नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

प्रकार असे की, काही दिवसांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती केली. मात्र व्यास यांच्या नियुक्तीवर अनेकांनी नाराजी दर्शवत याला विरोध केला. चंद्रकांत पाटील यांनी रवी व्यास यांच्या नियुक्तीचे पत्र सोशल मीडियावर टाकल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं.

मीरा-भाईंदरच्या मंगळवारी भाजपच्या ६१ पैकी ४० नगरसेवकांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यास यांच्या नियुक्तीला जोरदार विरोध केला आहे. पक्षाने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढचा निर्णय घेऊ असा इशारा त्या ४० नगरसेवकांनी थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना दिला आहे. यावर आता पक्ष नेतृत्व काय निर्णय गेले हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, मेहता यांची अर्धनग्न अवस्थेतील अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडल्याचं जाहीर केलं असलं तरी सत्ताधारी भाजपच्या पालिकेच्या व पक्ष कामकाजात त्यांचा सहभाग आहे. तसेच पक्ष संघटना सुद्धा हातात ठेवण्यासाठी मेहता समर्थक व मेहता विरोधक यांच्यात रस्सीखेच आहे.

Team Global News Marathi: