आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ; फोन करून राज ठाकरे म्हणाले की,

 

उसामनाबाद | तुळजापुर तालुक्यात रामतीर्थ तांडा येथील प्रणिता मोहन पवार हिने २०१७ साली श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावत देशाचे नाव उंच केले होते. कराटे स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूला हरवून तिन भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते मात्र आज याच आंतरराष्ट्रीय खेळाडूवर उपासमारीची वेळ आली आहे.

प्रणिता पवार हिचे वडील रिक्षा चालवून घराचा खर्च चालवत होते. मात्र दीड वर्षापुर्वी कोरोनानं त्यांचं निधन झालं. यामुळे प्रणिताच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आई रोजगार करून घराचा गाडा चालवते. प्रणिताच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याची तसेच उपासमारीची माहिती मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांना समजताच त्यांनी या पवार कुटुंबीयांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना या प्रकरणी माहिती देताच त्यांनी प्रणिता पवार हिच्याशी फोनवरून संवाद साधत तिला धीर दिला.

मनसेनं प्रणिता पवार कुटूंबीयांची भेट घेऊन शैक्षणिक पालकत्व स्विकारत आर्थिक व साहित्याची मदत केली आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रणिताशी दुरध्वनीवरून संपर्क साधल्यानं तिलाही मोठा आधार मिळाला. त्याचसोबत मनसेनं माझ्या पाठिशी असंच राहावं अशी विनंती प्रणितानं राज ठाकरेंना केली. राज ठाकरेंशी संवाद झाल्यानंतर प्रणिताची आई इंदुबाई पवार यांना अश्रू अनावर झाले.

Team Global News Marathi: