काही दिवसापूर्वी कानपुर येथील व्यवसायिक पियुष जैन यांच्या घरी पडलेल्या छाप्याची जोरदार चर्चा आहे. या छापेमारीत जवळपास २८४ करोड रुपये सापडले आहे. ही आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी कॅश रेड असल्याचं म्हणत होते. पण आता राजस्थानमधून आलेल्या छापेमारीने सगळ्यांना हैराण केलं आहे. आता त्यापाठोपाठ आयकर विभागाने राजस्थानमध्ये इलेक्ट्रीक सामान विकणाऱ्या आणि कर्ज देणाऱ्या दोन व्यावसायिकांच्या घरी छापा मारला आहे.
या छापेमारीत ३०० करोड रुपयेची रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सीबीडीटीने मंगळवारी ही माहिती दिली. २२ डिसेंबर रोजी मारलेल्या छाप्यात आणि जयपूर, मुंबई, हरिद्वारमध्ये असलेल्या दोन अज्ञात समुहाची झाडाझडती करण्यात आली. आयकर विभागाच्या धोरण निर्मात्या संस्थेने सांगितले की व्यवहारांच्या पुराव्यांवरून १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न उघड झाले आहे जे उघड केले गेले नाही. त्यात दावा करण्यात आला आहे की समूहातील एका मुख्य व्यक्तीने ५५ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न “स्वीकारले” आणि त्यावर कर भरण्याची ऑफर दिली.
एका निवेदनात, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हटले आहे की, “जप्त केलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की स्विच, वायर, एलईडी इत्यादींच्या निर्मितीच्या व्यवसायात अनेक युनिट्स गुंतलेली आहेत. ते करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी बोगस खर्चाचा दावा करत आहेत. महत्वाची बाब म्हणजे 150 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे पुरावे मिळाले आहे. तसेच यांच्याकडून 17 कोटी रुपयाचे नकद रक्कम आणि आभूषण देखील जप्त केली आहेत.