“भाजपचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही; मालकही बदलतील, नाड्याही सुटतील!”

 

सध्या समीर वानखडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्या सुरु असलेल्या शाब्दिक चकमकीत अनेक धक्कदायक खुलासे समोर येताच दिसून येत आहे. त्यातच या प्रकरणात काल खासदार संजय राऊत यांनी उडी घेत पुढचा सिनेमा मी दाखवणार असे आव्हान देत थेट भाजपाला डिवचण्याचाप्रयत्न केला होत. आता त्या पाठोपाठ आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

ते आपलट अग्रलेखात म्हणतात की, २५ कोटींचे वसुलीचे प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे, असा इशारा सामनाच्या आजच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. तर प्रसिद्धी व कारवाईच्या बाबतीत ३५०० किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले. खोटी प्रकरणे गोळा करून काळा पैसा व प्रसिद्धी मिळवायची हा जोडधंदा झाला असल्याची खोचक टीकाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

भाजपचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही. त्यांचेही पाय मातीतच आहेत. त्यामुळे सत्तेची तागडी वर-खाली होत असते हे त्यांच्या प्रमुख लोकांनी विसरू नये. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून पक्षाने धुमाकुळ घातला आहे. त्यातीत एक-एक प्रकरण त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे. तर आर्यन खान आणि रिया चक्रवर्तीच्या प्रकरणावरूनही एनसीबीवर निशाणा साधण्यात आला आहे.

४ हजारांच्या अंमली पदार्थांची चौकशी हे एनसीबीचे काम नाही. त्यासाठी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र अंमली पदार्थविरोधी पथक आहे. मुंबई पोलिस अधूनमधून कोट्यवधी रूपयांचा माल पकडतात आणि नष्टही करतात, पण ते प्रसिद्धीसाठी उद्योग करत नाहीत, अशी खोचक टीकाही सामनातून करण्यात आली आहे. आपल्या कारवाया वादग्रस्त का ठरत आहेत? याचा शोध ज्याने त्याने घ्यायला हवा, असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.

Team Global News Marathi: