कुख्यात गुंड गजा मारणे अखेर पोलिसांच्या ताब्यात

सातारा  : पुणे येथून खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका करण्यात आल्यानंतर कारागृहाच्या दारातून जंगी मिरवणूक काढण्यात आलेली कुख्यात गुंड गजा मारणे चांगलाच चर्चेत आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली होती. मात्र आता या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी मारणे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

जावळी तालुक्यातील मेढा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी मारणे याला अटक केली आहे.जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता. मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापाला रचून त्याला अटक केले होते.

खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर माध्यम व सामाजिक स्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो थेट महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता

Team Global News Marathi: