इंदुरीकर महाराजांचं आमदार निलेश लंकेंना समर्थन

 

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांनी निलेश लंके यांच्या समर्थनात भाष्य केले आहे. तसेच थेट लंकेंना devachi उपमा देऊन टाकली आहे.

संत तुकारामांना समाजाने त्रास दिला ते जगदगुरू झाले, ज्ञानेश्‍वर ज्ञानीयांचे राजा झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले, असे सांगत टिकाकारांकडे लक्ष न देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी आपले समाजकार्य असेच पुढे सुरू ठेवण्याचा सल्ला प्रबोधनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांनी दिला.श्रावणानिमीत्त कोविड उपचार केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी आमदार लंके यांच्या कामाचे कौतुक केले.

“जे दगड घाव सहन करतात तेच देवाच्या मुर्तीसाठी वापरले जातात. आमदार लंके सर्वात जास्त घाव सहन करणारा दगड आहेत. ज्या झाडाला जास्त फळ ती झाड वाकतात, तीच जास्त दिवस टिकतात. आमदार लंके यांचे झाड वाकलेलं आहे. त्यामुळे ते राजकरणात २५ वर्षे टिकणार” असे भाकीत इंंदुरीकर महाराज यांनी केले आहे.

Team Global News Marathi: