सासऱ्याच्या जाचाला कंटाळून जावण्याने केली आत्महत्या, आईच्या नावे लिहिला भावुक संदेश

 

पुणे | सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. वर्षभरापूर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. तरुणाजवळ सुसाईड नोटही सापडली असून त्यात ‘आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन’ असं त्याने आईसाठी भावुक संदेश लिहिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आयुष्य संपवलं. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. त्यानंतर तिथे मृत्यू पत्र म्हणून चिठ्ठी सापडली होती. या चिट्टीमुळे एकच आत्महत्येचा खार कारण समोर आलं होता.

सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुसाईड नोटमध्ये केली आहे. पुढे आईबद्दल दोन शब्द लिहिताना चिट्टीत लिहिले आहे की, आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे असेही चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.

Team Global News Marathi: